पत्त्याची गम्मत🃏

 पत्त्याची गम्मत🃏


 पत्ते हे सामान्यतः आयताकृती पातळ पुटठ्याचे  किंवा प्लॅस्टिक चे बनविलेले असतात. बदाम, इस्पिक, किलवर किंवा किल्वर   आणि चौकट. या चार प्रकारात प्रत्येकी 13 पत्ते मिळून 52 पत्त्याचा संच होतो. 

       पत्त्याची विभागणी एक्का, दुर्री, तिर्री, या क्रमाने दशी पर्यन्त, गुलाम, राणी, राजा याशिवाय 2 जोकर असतात.


1) 52 पत्ते म्हणजे 52 आठवडे

2) 4 प्रकारचे पत्ते म्हणजे 4 ऋतु. 

प्रत्येक ऋतू चे 13 आठवडे.

3)या सर्व पत्त्याची बेरीज 364

4)एक जोकर धरला तर 365 म्हणजे 1 वर्ष.

5) 2 जोकर धरले तर 366 म्हणजे लीप वर्ष.

6) 52 पत्यातील 12 चित्र पत्ते

     म्हणजे 12 महिने

7) लाल आणि काळा रंग म्हणजे

      दिवस आणि रात्र.


   पत्त्यांचा अर्थ समजून घेऊ

1) दुर्री म्हणजे पृथ्वी आणि आकाश

2)तिर्री म्हणजे ब्रम्हा, विष्णू आणि 

    महेश

3) चौकी म्हणजे चार वेद

     (अथर्व वेद, सामवेद,   ऋग्वेद,अथर्ववेद)

4) पंजी म्हणजे  पंच प्राण

    (प्राण, अपान, व्यान, उदान ,समान)

5)छक्की म्हणजे षड रिपू

   (काम ,क्रोध,मद,मोह, मत्सर, 

    लोभ)

6)सत्ती- सात सागर

7)अटठी- आठ सिद्धी

8) नववी- नऊ ग्रह

9) दसशी- दहा इंद्रिये

10) गुलाम- मनातील वासना

11)राणी- माया

12) राजा-सर्वांचा शासक

13) एक्का- मनुष्याचा विवेक

14) समोरचा भिडू - प्रारब्ध


 पत्त्याचा डाव खेळताना आयुष्याच्या डावाचा अर्थ समजून घेतला तर जगणे नक्कीच सोपे होऊ शकते!!!🪔🌼🪔

Post a Comment (0)
Previous Post Next Post