फ्यूज बल्ब.....

 रिटार्यड [सेवानिवृत्त] झाल्यावर कोणता फ्युज बल्ब बनावे हे जीवन जगतानां प्रत्येकांने ठरवावे.....


फ्यूज बल्ब.....


सर्व फ्यूज झालेले बल्ब एक सारखेच असतात...!!


एक वरिष्ठ अधिकारी सेवा निवृत्त झाल्यावर महालासारखे सरकारी घर सोडून एका हाउसिंग सोसायटीत, त्यांच्या स्वत:च्या फ्लॅटमध्ये राहायला गेले. 


ते सेवा निवृत्त असले तरी, स्वतःला एक मोठा अधिकारी समजत असतं आणि कधीही कोणाशी जास्त बोलत नसतं. 

ते दररोज संध्याकाळी सोसायटीच्या पार्कमध्ये फिरत असताना सुद्धा, दुसऱ्यांची उपेक्षा करत आणि तिरस्कृत नजरेने पाहत असत.


एके दिवशी त्यांच्या शेजारी बसलेल्या एका ज्येष्ठ गृहस्थाने त्यांच्याशी संभाषण सुरू केले आणि हळूहळू या गप्पा-गोष्टी पुढेही चालू राहिल्या. आता ते दोघे रोज संध्याकाळी भेटत आणि खूप गप्पा मारत.  


प्रत्येक वेळी त्यांचे बोलणे बहुत करून एकतर्फी असे, कारण ते निवृत्त होऊन आलेले अधिकारी एक सारखे फक्त स्वतःबद्दलच बोलत असत. ते कधीही बोलायला लागले की म्हणायचे, "सेवा निवृत्त व्हायच्या आधी मी इतक्या पदावर कार्यरत होतो, की तुमच्यापैकी कोणीही त्या पदाची कल्पनासुद्धा करू शकणार नाही, केवळ नाइलाज आहे म्हणून मी येथे आलो आहे." आणि ते गृहस्थ अशाच अनेक गप्पा करत असत आणि ते दुसरे वयस्कर गृहस्थ शांतपणे  त्यांचे सगळे बोलणे ऐकून घेत असत.


बरेच दिवसांनंतर एके दिवशी त्या सेवानिवृत्त अधिकाऱ्याने इतर ज्येष्ठ नागरिकांबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता दाखविली, तेव्हा मग त्या गृहस्थाने इतर प्रत्येक व्यक्तीची माहिती देण्यास सुरुवात केली.


ते म्हणाले, “सेवा निवृत्त झाल्यावर, आपण सगळे फ्यूज झालेल्या बल्बसारखे असतो. याने काही फरक पडत नाही की त्या बल्बची वॉट क्षमता किती होती, फ्यूज व्हायच्या आधी त्याने किती प्रकाश अथवा उजेड दिला."


पुढे ते म्हणाले, "मागील 5 वर्षांपासून मी ह्या सोसायटीत राहातो आहे, परंतु आजपर्यंत कोणालाही हे सांगितले नाही की मी दोन वेळा सांसद म्हणून राहिलो होतो. 

तुमच्या उजवीकडे वर्माजी आहेत, जे भारतीय रेल्वेत महाप्रबन्धक पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत.

तिकडे सिंग साहेब आहेत, जे सेनेत मेजर जनरल होते. 

तिकडे बाकावर पांढऱ्या शुभ्र पोशाखात बसलेले ते गृहस्थ मेहराजी आहेत, जे इस्रो (ISRO) च्या प्रमुख पदावरून सेवा निवृत्त झाले आहेत.

आजपर्यंत त्यांनी ही गोष्ट कोणालाही सांगितली नाही, मलासुद्धा, पण मला माहीत आहे."


"सगळे फ्यूज उडालेले बल्ब आता  एक समानच आहेत - त्यांची वॉट क्षमता काहीही असो  - 0, 10, 40, 60, 100 वॉट - आता त्याने काहीही फरक पडत नाही. आणि यामुळेसुद्धा काही फरक पडत नाही की फ्यूज व्हायच्या आधी तो कोणत्या प्रकारचा बल्ब होता - एलईडी, सीएफएल, हॅलोजन, फ्लोरोसेंट, किंवा सजावटीचा.

आणि माझ्या मित्रा, हीच गोष्ट तुलासुद्धा लागू होते. ज्या दिवशी तुला ही गोष्ट समजेल, त्यादिवशी तुला या सोसायटीतसुद्धा शांती आणि समाधान लाभेल.


उगवता सूर्य आणि मावळता सूर्य दोन्ही अतिशय सुंदर आणि मनमोहक दिसतात.


परंतु, खरे पाहता उगवत्या सूर्याला जास्त महत्त्व दिले जाते. इतके की त्याची पूजा सुद्धा केली जाते. पण मावळत्या सूर्याला तितके जास्त महत्त्व दिले जात नाही.


ही गोष्ट जितक्या लवकर समजेल तितके चांगले आहे."


आपलं वर्तमान पद, नाव आणि रुबाब हे स्थायी नसतात. 


या गोष्टींबद्दल जास्त जिव्हाळा व आसक्ती ठेवली असता, आपले जीवन अधिकच गुंतागुंतीचे होते कारण एके दिवशी आपण ह्या सर्व गोष्टींना मुकणार असतो. 


लक्षात ठेवा की जेव्हा खेळ संपतो, तेव्हा राजा आणि प्यादे एकाच डब्यात बंदिस्त होतात. 


आज, आपल्या जवळ जे काही आहे त्याचा आनंद घ्या आणि भविष्यात उत्तम जीवन जगा ... 

➖➖🙏🏻🌹🌹🙏🏻➖➖

(कॉपी पेस्ट)

Post a Comment (0)
Previous Post Next Post